दगडूशेठ गणपती आता काश्मीरमध्ये-मराठा लाइट इन्फेंट्रीला पाठवले

दगडूशेठ बाप्पा आता जम्मू कश्मीर मध्येही 


काश्मीरमध्ये राबत असलेल्या सैन्यांसाठी आता तिथल्या मंदिरमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई प्रतिकृती मूर्ति बसविण्यात येणार आहे .

Dagdusheth Halwai Ganpati In Kashmir - Maratha Battalion

भारतीय सैन्यदलात असलेल्या सैन्यांनी भारतीय सैन्यातर्फे तिथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई प्रतिकृती मूर्ति बसविण्याची मागणी केली होती आणि तिथे असलेल्या ६ मराठा बटालियन एक मंदिर उभारण्यात आले होते त्या मंदिरात ते स्थापना करण्याची मागणी भारतीय सैनिकांनी केली होती . ही प्रस्तावना ऐकत तिथले कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या अध्यक्षपदी असलेल्या अशोक गोडसे यांना एक विनंती पत्र  लिहीले

श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुणे - मराठा लाइट इन्फेंट्री

कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले की, आमचे युनिट सध्या गुरेज सेक्टर, जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. आम्ही येथे एक गणेश मंदिर बनवले आहे. मंदिरामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूतीर्ची कायमस्वरूपी स्थापना करु इच्छितो. या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल आणि अप्रतिम मूर्तीमुुळे आमच्या मंदिराची शोभा वाढेल. याकरीता आपण अडीच फुटांची गणेश मूर्ती मंदिरासाठी भेट म्हणून द्यावी

हे विनंती पत्राचा सन्मान करून स्वीकारत त्यांनी लवकरच त्यांना मूर्ति पाठविण्याचा निर्णय ट्रस्ट ने घेतला .
या प्रतिरूप 3 फूटी मूर्तीचे शिल्पकार विपुल खटावकर यांनी लवकरच ही मूर्ति तयार केली , आणि लवकरच ट्रस्ट ने प्रतिरूपी मूर्तीवर पूजाविधी करून ट्रेन द्वारे सैनिकांकडे रवाना करण्यात आली .

 Dagdusheth Ganpati Pune -दगडूशेठ गणपती पुणे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्त केवळ महाराष्ट्रातच नसून संपूर्ण भाताच्या कांनाकोपर्‍यातून दर्शनाला पुणेला येतात . तसेच भारतीय सैन्यही त्यांच्या मंदिरात प्रतिरूपी दगडूशेठ गणपती बसविण्यात इछुक होते आणि ट्रस्ट ने ती पूर्णही केली.

Maratha Light Infantry


सलाम भारतीय जवानांना . सलाम  मराठा लाइट इन्फेंट्रीला


Post a Comment

0 Comments