यावर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणिचा आगमन सोहळा रद्द ?
![]() |
CHINCHPOKLI CHA CHINTAMANI (CREDIT GOES TO RESPECTED OWNER) |
१०१च्या वर्षात कसा होणार आगमन सोहळा आणि पाटपूजन सोहळा ?
मुंबईचा सर्वात मोठा आगमन सोहळा या मानाने प्रसिद्ध असलेल्या चिंतामणीचे आगमन बाबत काही मुद्दे . १०१व्या वर्षी पदार्पण करण्यार्या चिंचपोकळीचा चिंतामणि (चिंचपोकळीचा सार्वजनिक उत्सव मंडळ) याने चिंतामणी भक्तांना विचार करत आणि सध्याची कोरोना माहामारीची परिस्थिति बघत आणि मुंबई पोलिसांवर असलेली जबाबदारी पाहत , पोलिसांवर गणेशोत्सवात अतिरिक्त तान पडू नये म्हणून यंदाच्या वर्षाचे चिंचपोकळीच्या चिंतामणिचे आगमन रद्द करण्याचा मोठा निर्णय घेऊन चिंतामणीच्या मंडपातच मूर्ति घडविण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि मूर्तीच्या उंचीबाबत शासन जेव्हा नियमावली जाहीर करणार त्या आदेशाचे पालन करून मूर्ति जागेवरच बनविण्यात येईलरेशमा खातू यांची तयारी आहे ?
चिंतामणीची मूर्ति जागेवर घडविण्याबाबत चिंतामणीच्या मूर्तिकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी असल्याचे सांगितले आहे . सध्याची परिस्थिति पाहता हा निर्णय खूप महत्तवाचा असेल .पाटपूजन सोहळा रद्द ?
चिंचपोकळीच्या चिंतामणिचा पाटपूजन सोहळा रद्द करून , काही ठराविक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेऊन साधेपणाने पाटपूजन करण्यात येईल . यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येईल भव्य सजावट आणि रोषणाई वर जास्त खर्च न करता ते पैसे वाचवून जमा झालेला पैसा शासकीय हॉस्पिटलला वैद्यकीय उपकरणे आणि तसेच गरजूकारिता रुग्नोपोयगी साहित्यकेंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे
यावर्षी ऑनलाइन पहिले दर्शन पाहायला मिळतील असे सुद्धा ऐकण्यात येत आहे ...
Read also these हॉलीवुड आता शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवनार
0 Comments
please do not enter any spam comment