मराठा लाइट इन्फेंट्री - २५० वर्ष जुने बटालियन

मराठा लाइट इन्फेंट्री


जेव्हा जेव्हा मराठा हा शब्द उच्चारला जातो तेव्हा समोर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा दिसते
भारतीय सेनेमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत..
पंजाब रेजिमेंट,                                                                             
राजपूत रेजिमेंट,
बिहार रेजिमेंट,
डोग्रा रेजिमेंट,
मराठा लाइट इन्फेंट्री व महार रेजिमेंट
त्यातल्या काही रेजिमेंट आहेत,
सगळ्याच जन्मजात पराक्रमी...
यांच्या सर्वांच्या युद्धगर्जना "Battle Cry किंवा War Cry"
अतिशय सुंदर आणि आत्मिक शक्ती जागृत करणाऱ्या आहेत...
पंजाब रेजिमेंटची युद्धगर्जना "जो बोले सौ निहाल" अशी आहे.
नागा रेजिमेंटची युद्धगर्जना "जय दुर्गा नागा" अशी आहे.
जाट रेजिमेंटची युद्धगर्जना "जाट बलवान, जय भगवान"
आहे.
डोग्रा रेजिमेंटची युद्धगर्जना "ज्वाला माता कि जय"
अशी आहे.
तर,  बिहार रेजिमेंटची "जय बजरंगबली" अशी आहे.
सगळ्या युद्धगर्जना त्यांच्या-त्यांच्या देवांच्या नावाने आहेत.
तर मराठा लाइट इन्फेंट्रीची युद्धगर्जना
"बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!"
अशी जबरदस्त आहे...
ही एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या आणि एका महापुरूषाच्या नावाने आहे...
मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना
'छ.शिवाजी महाराज की जय'

महाराष्ट्रातून मराठ्यांची पहिली बटालियन बॉम्बे सेपोय यानावाने ऑगस्ट १७६८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने उभारली मुंबई आणि त्याच्या उपद्वीप सुरक्षित ठेवण्यासाठी यात बहुसंख्य सैनिक हे मराठा होते. ही बटालियन जंगी पलटण या नावाने ओळखली जात होती.
        त्यानंतर १८२४ मध्ये बॉम्बे नेटिव इनफांटरी ही बटालियन १९२२ नंतर मराठा लाइट इन्फेंट्री या नावाने ओळखली जाऊ लागली.
या रेजिमेंट ने पहिल्या महायुद्धात व दुसर्‍या  महायुद्धात लढले होते. मराठा रेजिमेंट एकमात्र असा रेजिमेंट आहे जे अगोदर एक सक्रिय बटालियन होता आणि पहिल्या  महायुद्धातनंतर हे बटालियन बेळगाव ला आले तेव्हा बेळगाव ला एक रेजिमेंटल सेंटर यात रूपांतर करण्यात आले.
दुसर्‍या महायुद्धात मराठा लाइट इन्फेंट्री युद्ध सन्मान सुद्धा देण्यात आले , त्यात एकूण ३६ GALLENTRY AWARDS देण्यात आले. अजून पर्यंत कोणत्याही बटालियन ला इंडियन आर्मी मध्ये अजून पर्यंत नाही भेटले आहे .
लाइट इन्फेंट्री म्हणजे एक अशी रेजिमेंट असते त्यांच्याकडे TANK आणि रणगाडा त्यांच्या सोबत नसतात ते पायी चालणारी सैनिक यूनिट असतात ज्यांच्याकडे काही आधुनिक राईफल असते आणि काही तोफ. 
आज मराठा लाइट इन्फेंट्री मध्ये ८०% सैनिक महाराष्ट्रातून येतात आणि उरलेले २०% सैनिक कर्नाटक , मध्य प्रदेश , गोवा , गुजरात , छत्तीसगढ , तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ने येतात.
मराठा लाइट इन्फेंट्री आज २१ बटालियन मजबूत आहे. मराठा लाइट इन्फेंट्रीचे काही सन्मान ...


  • २ व्हिक्टोरिया क्रॉस (जागतिक महायुद्ध २)           
  • ४ अशोक चक्र 
  • १० परम विशिष्ट मेडल 
  • ४ महावीर चक्र 
  • ४ कीर्तीचक्र 
  • १४ अतिविशिष्ट सेवा मेडल    
अजून अनेक प्रकारचे वेगवेगळे मेडल / सन्मान(awards) भेटले आहे. २५० वर्ष जुनी ही रेजिमेंट आहे .

@ou

"बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!"
ही एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या आणि एका महापुरूषाच्या नावाने आहे...
मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना
'छ.शिवाजी महाराज की जय'
ही कधीपासुन दिली जाऊ लागली हे पाहणे सुध्दा रंजक
ठरेल.
१९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया.
या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे.
या प्रांतात उंच उंच अशा डोंगर रांगा आहेत.
या डोंगर रांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक".
हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती.
बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता.
परंतु या मराठा रेजिमेंटमध्ये 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं आम्हांला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या.
आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून दाखवतो,
पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर?
पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळं त्यांच्या स्वार्थापोटी नाईलाजाने त्यांनी ही परवानगी दिली व नंतर आपल्या लोकांनी
'बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय'
म्हणत एका रात्रीत किल्ला सर केला आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही Battlecry
म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली.
या युद्धगर्जनेमुळे केवळ सह्याद्रीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय नाही.
जय जिजाऊ
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय
source:- insta@history_maharashtra & Googleमराठा 
लाइट 
इन्फेंट्री

Post a Comment

0 Comments