शिवरायांच्या इतिहासावर हॉलीवुडमध्ये चित्रपट

 हॉलीवुड आता शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवनार


आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपति शिवाजी महाराज यांचा इतिहास महान आहे. छत्रपति शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा गर्वच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांना प्राधान्य दिले जाते. असा इतिहास जाणून घेणे म्हणजे साक्षात त्यांचे जीव जाणून घेणे , असाच प्रकारे त्यांच्या इतिहासाला एका चित्रपटात रुपात बघने किती बरे वाटेल. खुप भारतीय चित्रपटाने हे कार्य केले आहे आणि आता हॉलीवुड सुद्धा यामध्ये प्रवेश करणार आहे.
हॉलीवुडमधील उत्कृष्ट मार्टिनी फिलम्स व पिंक जॅग्वार एंटरटेनमेंट या नामवंत संस्था भारतीय चित्रपट निर्माते व सरकारच्या संयुक्त सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांवरील एका भव्य चित्रपटाची निर्मिति लवकरच करणार आहेत.
@OU
त्याचबरोबर माजी राष्ट्रपती. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे बायोपिक व भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढयासह अन्य चार चित्रपटांचीही निर्मिति या संस्था करतील.
याद्वारे भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक होईल. डॉ कलाम यांच्यावरील बायोपिकचा 'फर्स्ट लुक' केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावड़ेकर यांच्या हस्ते आज प्रसिद्ध करण्यात आला. याच वेळी जगदीश जानेटी , सुवर्ण पप्पू , मार्टिन आदि उपस्थित होते.
डॉ कलाम यांच्यावरील 'डॉ एपीजे अब्दुल कलाम : द मिसाइल मॅन' या चित्रपटात लोकप्रिय दखिनात्य अभिनेता अली हा डॉ कलाम यांची भूमिका साकारणार आहे. यावर्षअखेरपर्यंत हा चित्रपट रासिकांच्या भेटीला आणणाच्या निर्माताच्या निर्धार आहे.
@ou

हॉलीवुड निर्माता जॉनी मार्टीन व जगदीश दानेटी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. जावड़ेकर यांनी सांगितले , की हॉलीवुड व टॉलीवुडच्या संयुक्त प्रयत्ननांतून साकरण्याऱ्या या चित्रपटाबरोबर अन्य चार चित्रपटांचीही निर्मिति करण्यात येणार आहे. यात शिवरायांवर आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढयावरील चित्रपटांचाही समावेश असेल. यातून एक अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक देशात होणार आहे.

Also read this  anime to watch 

Hindi

Post a Comment

0 Comments