भवानी तलवार परत आणणे शक्य आहे तुमच्या व आमच्या सहाय्याने

भवानी तलवार परत घेण्याची मोहीम

दी : २२ जानेवारी , २०२०

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही बातमी पसरणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार इंग्लंड येथील रॉयल कलेक्शन ट्रस्ट संग्रहालयात आहे व ती तलवार पुन्हा भारतात आणावी याकरिता शिवऋण युवा प्रतिष्ठानच्या वतीने २ कोटी शिवभक्तांची सहयांची मोहीम नगर शहरात सुरू करण्यात आली.
दिल्लीगेट येथे या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तलवारीच्या सहाय्याने महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचे कार्य केले अखंड महाराष्ट्रचे स्वप्न पहिले .
पण तीच तलवार आज दुर्दैवाने इंग्लंडमध्ये आहे .ती तलवार परत मिळावी म्हणून चाललेला हा प्रयत्न हा विफल जाणार नाही . कारण ज्या वेळी शिखांनी लढा उभारला त्यावेळेस इंग्लंडने शिखांच्या गुरूंची सर्व हत्यारे परत केली. सन १९७९ मध्ये टिपू सुलतानची तलवार दिली . मग छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार का देत नाही ?
आता तलवार जो पर्यन्त मिळत नाही तो पर्यन्त आपण शिवभक्तांनी शांत बसायचे नाही.
Add caption
जीव की प्राण एक करून टाकू , पण महाराष्ट्राला माझ्या राजांची तलवार मिळवून देऊ या महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता असणारी तलवार आपण सर्व शिवभक्त रक्ताच्या शेवटच्या थेंबावर प्रयत्न करणार आहोत . सुमारे २ कोटी शिवभक्तांच्या सहयांचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याचे हभप आकाश महाराज फुले यांनी संगितले
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार म्हणतात. ही तलवार श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी माता देवीने दिली असे सांगतात.
भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहीत नाही. इतिहासकार ग.ह खरे  सांगत, "भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कवीच्या शंभुराजचरित्रात हिचा उल्लेख आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर तज्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता देणार नाहीत.

ही माहिती अधिक अधिक शिवभक्तापर्यन्त पोहचवा.

read also this 

60 Best Anime You Should Watch Before You Die

Post a Comment

0 Comments